
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर गुरुवारी सीमा सुरक्षा दलाने अर्थात बीएसएफने घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला. सीमा सुरक्षा दलाने बुधवार ८ मे २०२५ रोजी रात्री अकरा वाजता घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळला आणि किमान सात अतिरेक्यांना ठार केले.
#WATCH | On 8-9 May 2025, BSF foiled a major infiltration bid at the International Boundary in Samba district, J&K by killing at least seven terrorists and causing extensive damage to the Pakistan Post Dhandhar, says BSF.
(Source: BSF) pic.twitter.com/c2MWOUuvQs
— ANI (@ANI) May 9, 2025
At around 2300 hours on 8 May 2025, BSF foiled a major infiltration bid at the International Boundary in Samba district, J&K. @BSF_India @PMOIndia @HMOIndia @PIBHomeAffairs @PIB_India @BSF_SDG_WC @mygovindia
— BSF JAMMU (@bsf_jammu) May 8, 2025
पाकिस्तान रात्रीपासूनच जम्मूत विमानतळ, सैन्याची जम्मूतील कार्यालये, भारत - पाकिस्तान सीमेवर अनेक चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन हल्ल्याचे प्रयत्न सातत्याने करत होता. भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पाकिस्तानचे सैन्य भारताविरोधात कारवाई करत असताना अतिरेकी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पण सदैव सावध असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अतिरेक्यांच्या विरोधात तातडीने कारवाई केली.
पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी भारतात पहलगाम येथे हल्ला केला आणि २५ भारतीय तसेच एका नेपाळी नागरिकाची हत्या केली. यानंतर भारताने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळांवर कारवाई केली. पण अतिरेक्यांचा जोडीदार असलेल्या पाकिस्तानचा संताप झाला. त्यांनी लगेच ७ मे रोजी रात्री आणि ८ मे रोजी मध्यरात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील निवडक शहरांवर मोजक्या ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. ही कारवाई कमालीची यशस्वी झाली. ड्रोन हल्ल्यामुळे भडकलेल्या पाकिस्तानने ८ मे रोजी रात्रीपासूनच भारतावर हल्ले करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानने नागरी वस्ती आणि सैन्याची आस्थापने या दोन्हीला लक्ष्य करुन हवाई हल्ले सुरू केले. तसेच सीमेवर गोळीबार आणि जड तोफांचा मारा सुरू केला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने प्रचंड वेगाने आणि अतिशय प्रभावी उत्तर दिले. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना आकाशातच नष्ट केल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी तीव्र हल्ले केले. पाकिस्तानच्या सर्व विमानतळांना आणि सैन्याच्या आस्थापनांना लक्ष्य करुन हल्ले करायला सुरुवात झाली. या कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन, लहान - मोठी क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, अॅवॅक्स रडार नष्ट केले. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या कराची बंदरात आणि अनेक विमानतळांवर सतत स्फोट होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही परिस्थिती सकाळ उजाडली तरी कायम आहे.