
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक झाली आहे. आज ९ मेला बीसीसीआय आयपीएल २०२५ बाबत अंतिम निर्णय घेऊ शकतो. बीसीसीआयची पहिली प्राथमिकता परदेशी खेळाडूंना त्यांना देशात पाठवण्याची आहे.
आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. अशातच सवाल आहे की हा सामना रंगणार की नाही.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे ८ मे बुधवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द करण्यात आला. तर धमरशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम खाली करण्यात आले. खेळाडूंना धरमशाला येथून दिल्लीला आणण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्यात आली. बीसीसीआयने खेळाडू आणि सहयोगी स्टाफला प्राथमिकतेच्या आधारावर वंदे भारतची व्यवस्था केली.
बीसीसीआयचे विधान
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी सध्याच्या स्थितीवर गुरूवारी विधान केले. ते म्हणाले, सर्व काही परिस्थिती लक्षात घेता आम्ही सामना रद्द करण्याचा निर्णय घेला आहे. सध्या परिस्थिती योग्य नाही यासाठी ८ मेचा सामना रद्द करण्यात आला. शेजारी देश परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.