Sunday, October 26, 2025
Happy Diwali

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी सकाळीच चंदिगडमध्ये सायरन वाजू लागले आहेत. आकाशात एक संशयास्पद ड्रोन दिसताच सायरन वाजवण्यात आले. चंदिगडमध्ये असलेल्या विमानतळावरील नागरी विमान वाहतूक सध्या बंद आहे. फक्त सैन्याच्या विमानांची वाहतूक सुरू आहे. यामुळे हल्ल्याचा प्रयत्न हा विमानतळाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने होता का ? अशी शक्यता व्यक्त होत आहे. चंदिगड व्यतिरिक्त जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्येही सायरन वाजवण्यात आले आहेत. तिथेही संशयास्पद ड्रोन दिसताच सायरन वाजवण्यात आले. नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव घराबाहेर पडण्यास पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात आली आहे. सशस्त्र दले सावध असून ड्रोन नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहेत.

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी भारतात पहलगाम येथे हल्ला केला आणि २५ भारतीय तसेच एका नेपाळी नागरिकाची हत्या केली. यानंतर भारताने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळांवर कारवाई केली. पण अतिरेक्यांचा जोडीदार असलेल्या पाकिस्तानचा संताप झाला. त्यांनी लगेच ७ मे रोजी रात्री आणि ८ मे रोजी मध्यरात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील निवडक शहरांवर मोजक्या ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. ही कारवाई कमालीची यशस्वी झाली. ड्रोन हल्ल्यामुळे भडकलेल्या पाकिस्तानने ८ मे रोजी रात्रीपासूनच भारतावर हल्ले करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानने नागरी वस्ती आणि सैन्याची आस्थापने या दोन्हीला लक्ष्य करुन हवाई हल्ले सुरू केले. तसेच सीमेवर गोळीबार आणि जड तोफांचा मारा सुरू केला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने प्रचंड वेगाने आणि अतिशय प्रभावी उत्तर दिले. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना आकाशातच नष्ट केल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी तीव्र हल्ले केले. पाकिस्तानच्या सर्व विमानतळांना आणि सैन्याच्या आस्थापनांना लक्ष्य करुन हल्ले करायला सुरुवात झाली. या कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन, लहान - मोठी क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, अॅवॅक्स रडार नष्ट केले. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या कराची बंदरात आणि अनेक विमानतळांवर सतत स्फोट होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही परिस्थिती सकाळ उजाडली तरी कायम आहे.

Comments
Add Comment