Sunday, October 19, 2025
Happy Diwali

शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? काका-पुतण्या एकत्र येणार का?

शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? काका-पुतण्या एकत्र येणार का?

मुंबई : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा कमालीची हालचाल दिसून येत आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनीच हे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, आमच्या पक्षात दोन विचारधारा आहेत. एक गट अजित पवारांसोबत यायला इच्छुक आहे. त्याचबरोबर त्यांनी थेट नाव घेऊन म्हटलं की, "एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून घ्यावा."

हे वक्तव्य म्हणजेच फुटलेले दोन्ही गट परत एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू आहे. अजित पवारांकडे आमदारांची संख्या, तर शरद पवारांकडे पारंपरिक मतदार आणि राष्ट्रीय ओळख आहे. दोघे एकत्र आले, तर पक्ष पुन्हा ताकदीने उभा राहू शकतो.

गेल्या काही महिन्यांत गुप्त भेटी, सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती, आणि आता हे सूचक विधान, त्यामुळेच काका-पुतण्याच्या 'री-युनियन'ची जोरदार चर्चा सुरू आहे.

शरद पवारांनी ‘INDIA’ आघाडीच्या कार्यक्षमतेवरही टीका केली आणि सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या एकतेकडे वाटचाल होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >