पाकिस्तानचा खासदार घाबरला; संसदेत ढसाढसा रडला!

एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’


इस्लामाबाद : भारताने अलीकडेच सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या अचूक हवाई कारवायांमुळे पाकिस्तानमध्ये घबराट उडाली आहे. एवढंच नाही तर या धक्क्याने पाकिस्तानचा एक माजी सैन्य अधिकारी आणि सध्या सत्ताधारी पक्षाचा खासदार थेट संसदेत ढसाढसा रडला! "अल्लाह हमारी हिफाजत करे" असे आर्जव करत तणावग्रस्त आवाजात हा खासदार थरथरत बोलला. हे दृश्य आता संपूर्ण पाकिस्तानचं अपयश अधोरेखित करतंय.



रडणारा खासदार आहे ताहिर इक्बाल, जो पाकिस्तान मुस्लिम लीग-एन (PML-N) या पक्षाचा प्रतिनिधी आहे आणि याच पक्षाचे प्रमुख म्हणजे सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ. विशेष म्हणजे, इक्बाल हे पूर्वी पाक सैन्यात मेजर होते. ते संसदेत बोलताना म्हणाले, “आपल्याकडे खूप कमतरता आहेत… आपण असहाय्य आहोत… अल्लाह माफ करो… आपण मोठे गुन्हेगार आहोत.”


या वक्तव्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली. भारताच्या ऑपरेशनने केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर पाकिस्तानच्या मनोधैर्यावरही जोरदार प्रहार केला आहे.



भारताकडून सर्जिकल अचूकता – पाकिस्तानकडून हतबल प्रयत्न


भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ नेस्तनाबूत करण्यात आले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने ७ मेच्या रात्री भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात पंजाबमधील ७ शहरे होती. मात्र, भारताच्या अत्याधुनिक एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने पाकची ही संपूर्ण योजना आकाशातच उध्वस्त केली.



एकीकडे भारत जिथे अचूकतेने प्रहार करत आहे, तिथे पाकिस्तानचा माजी सैन्य अधिकारी संसदेत आक्रोश करत “अल्लाह हमारी हिफाजत करे” म्हणतो आहे. या व्हिडिओमुळे सगळ्या जगासमोर पाकिस्तानच्या असहायतेचा आणि भीतीच्या छायेत वावरणाऱ्या पाकड्यांचा पर्दाफाश झाला आहे.

Comments
Add Comment

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर