Thursday, January 15, 2026

Operation Sindoor मुळे बिथरला पाकिस्तान, सीमेवर पुन्हा गोळीबार, भारताचे चोख प्रत्युत्तर

Operation Sindoor मुळे बिथरला पाकिस्तान, सीमेवर पुन्हा गोळीबार, भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर मोठा एअरस्ट्राईक केला. या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात पाकिस्तानचा प्रमुख दहशतवादी मसूद अजहरच्या नातेवाईकांना मारले.

भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती काही कमी होत नाहीत. त्यांनी बुधवारी आणि गुरूवारच्या रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूरसमोरील क्षेत्रात नियंत्रण रेषेवर छोटी हत्यारे आणि तोफखान्याचा वापर करून गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही यास जशास तसे उत्तर दिले.

जोधपूरमध्ये सुट्टीची घोषणा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती पाहता राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यामध्ये सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हा कलेक्टर गौरव अग्रवाल म्हणाले, आजपासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व सरकारी आणि खाजगी संस्थानांना सुट्टी राहील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >