
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. आता नुकतंच पाकिस्तानकडून जम्मूमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला. आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू दिसल्याने संपूर्ण जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जम्मूपाठोपाठ आता काश्मीरमधील कुपवाडामध्ये गोळीबार करण्यात आला.
/>
जम्मू शहरात स्फोटांचे आवाज ऐकूआल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर शहरात एअर सायरन वाजवण्यात आले आणि तातडीने संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले. नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्मूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. स्फोटांच्या आवाजामुळे जम्मूतील हवाई सुरक्षा यंत्रणा (एअर डिफेन्स सिस्टीम) सक्रिय करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये ५ ते ६ स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#WATCH | J&K | A complete blackout has been enforced in Akhnoor of Jammu Division; sirens are being heard. pic.twitter.com/Jgftczowww
— ANI (@ANI) May 8, 2025
१५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न
७ आणि ८ मे च्या रात्री पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपुर, बठिंडा, चंडीगढ़, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताकडे असलेल्या अत्याधुनिक S-४०० सिस्टिमने पाकिस्तानचा मिसाईल, ड्रोन हल्ले फेल ठरवला.