Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

IND-PAK तणावादरम्यान शिफ्ट झाला IPL चा सामना, आता धरमशाला नव्हे तर या ठिकाणी होणार सामना

IND-PAK तणावादरम्यान शिफ्ट झाला IPL चा सामना, आता धरमशाला नव्हे तर या ठिकाणी होणार सामना

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये


अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार, ११ मे रोजी धर्मशाला येथे होणारा पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.हा सामना धर्मशालाहून अहमदाबादला हलवण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी ही माहिती दिली आहे. हा सामना आता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.


पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना ११ मे रोजी दुपारी ३.३० वाजता अहमदाबाद येथे खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हा सामना धर्मशालाहून अहमदाबादला हलवण्यात आला आहे. कारण भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण असल्याने धर्मशाला विमानतळासह अनेक महत्त्वाची विमानतळे बंद ठेवण्यात आली आहेत.


विमान सेवा बंद असल्याने आयपीएल संघांना प्रवास करण्यात अडथळे येत असल्याने पंजाब आणि मुंबई सामन्याचे स्थळ बदलण्यात आले आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल म्हणाले की, बीसीसीआयने आम्हाला विनंती केली होती आणि आम्ही ती स्वीकारली. मुंबई संघ आज, गुरुवारी संध्याकाळी येथे पोहोचत आहे आणि पंजाब दौऱ्याचे वेळापत्रक नंतर कळेल. गुरुवारी धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना होणार आहे.

Comments
Add Comment