
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील तब्बल ९ दहशतवादी तळ उडविले. दुसरीकडे या कारवाईनंतर सोन्याच्या किमतींनी थेट आभाळ गाठलं.
जळगावच्या सुवर्णपेठेत सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. यामुळे जीएसटीसह सोन्याचा तोळा पुन्हा एकदा लाखाच्या वर गेला आहे. जळगावच्या सराफ बाजारात बुधवारी देखील सोने दरात वाढ झाली. सोन्याचा दर ५०० रुपयांनी वाढला. यामुळे जळगावात आता २४ कॅरेट सोन्याचा दर विना जीएसटी ९७७०० (१००६३१) रुपयावर पोहोचला आहे.
तर चांदीचा दर ९८००० रुपयावर आहे.दरम्यान या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने १८०० रुपयांनी वाढले होते. त्यानंतर मंगळवारी १४०० रुपयांनी तर बुधवारी ५०० रुपयांनी वाढले. यामुळे गेल्या तीन दिवसात जळगावात सोने दरात ३७०० रुपयांनी वाढले आहे.