Thursday, May 8, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

धरमशालाचे विमानतळ बंद, शिफ्ट होणार मुंबई-पंजाब IPL सामना?

धरमशालाचे विमानतळ बंद, शिफ्ट होणार मुंबई-पंजाब IPL सामना?

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर देशातील उत्तर आणि पश्चिम भागातील कमीत कमी १८ विमानतळे बंद करण्यात आली. यात श्रीनगर, लेहर, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धरमशाला आणि जामनगर यांचा समावेश आहे.



शिफ्ट होणार मुंबई-पंजाबचा सामना?


पाकिस्तानमध्ये दहशतवादी ठिकाणांवर भारताच्या मिसाईल हल्ल्यानंतर धरमशाला विमानतळ अस्थायी रूपाने बंद झाल्यानंतर आयपीएलच्या संघांचा प्रवास प्रभावित झाला आहे. धरमशालामध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. यानंतर ११ मेला पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई आणि पंजाब यांच्यातील ११ मेचा सामना मुंबईत शिफ्ट होऊ शकतो.


धरमशाला पंजाब किंग्स संघाचे दुसरे घरगुती मैदान आहे. पंजाब संघाला प्रवासासंबंधी कोणताही त्रास नाही. कारण ते या आठवड्याच्या अखेरीपर्यंत ते तिथेच राहतील. मुंबई संघाचा प्रवासाचा कार्यक्रम अजूनही अनिश्चित आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळेस सर्व काही अनिश्चित आहहे. संघांशी बातचीत सुरू आहे.

Comments
Add Comment