Friday, October 24, 2025
Happy Diwali

पाक दहशतवाद्यांना धडा शिकविला याचा आम्हाला सार्थ अभिमान : खा.नारायण राणे

पाक दहशतवाद्यांना धडा शिकविला याचा आम्हाला सार्थ अभिमान : खा.नारायण राणे

कोकणात भारत मातेचा जल्लोष

कणकवली : पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारताने नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते उध्वस्थ करत त्यांना धडा शिकविला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो. त्यांनी पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले, त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. आजची घटना ही आनंदाची व समाधानाची असून अशावेळी आपण सर्वांनी पंतप्रधानानी भारत मातेचे रक्षण चांगल्या प्रकारे करावे यासाठी त्यांच्या पाठीशी रहावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केले.

भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर या शौर्याला वंदन करण्यासाठी येथील प्रहारभवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत खा. राणे बोलत होते.

भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अड्यांवर केलेल्या कारवाईचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपणा प्रत्येक भारतीयाला पंतप्रधानांच्या या कृतीबद्दल अभिमान आहे, हे दाखविण्याची ही वेळ आहे. आपण सर्वांनी छोट्या-छोट्या सभा घेत प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन करावे, भारत मातेचे, देशाचे रक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे दाखवून द्या, असे आवाहनही श्री. राणे यांनी केले.

खा. राणे म्हणाले, जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेने भारत सुन्न झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बुधवारी मध्यरात्री पाक व्याप्त कश्मिरमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दशतवाद्यांची स्थळे उद्ध्वस्त केली. पाक पुरस्कृत दशतवादाला मुहतोड जबाब दिला. पाक पुरस्कृत दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे, ही बाब देशावीसायांसाठी गर्वाची आणि अभिमानाची आहे. राष्टलहितासाठी भूमिका घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा पाठिशी देशवासीयांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे राणेंनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा