
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामातील शेवटच्या सत्रात कोलकत्ताची फलंदाजी बहरत चालली आहे. गेल्या सामन्यात कोलकत्ताच्या आंद्रे रसेलला सुर गवसला आणि त्याने ह्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले. कोलकत्तासाठी ही एक चांगली बातमी आहे. मागील दोन्ही सामने जिंकल्यामुळे कोलकत्ताचे मनोबल नक्कीच उंचावले आहे व ते त्यांच्या कामगिरीतून निश्चितच दिसून येत आहे.
आजचा सामना कोलकत्तासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण चेन्नईचा संघ सध्या फॉर्ममध्ये नाही आहे त्यामुळे त्यांना हरवणे शक्य आहे. आणखी एक जमेची बाजू म्हणजे आजचा सामना कोलकत्ता घरच्या मैदानावर खेळणार आहे याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.
ईडन गार्डनचे मैदान फिरकीला साथ देते त्यामुळे सुनील नारायणन व वरुण चक्रवर्ती हे आजचा सामना नक्कीच गाजवतील. कोलकत्तासाठी चिंतेची बाब म्हणजे चेन्नईचा फिरकी गोलंदाज नूर अहमद, ज्याने या हंगामात चेन्नईतर्फे सर्वाधिक बळी घेतले आहेत. चेन्नईसाठी खुश खबर म्हणजे सलामीवीर आयुष म्हात्रेला गवसलेला सूर, त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध ४८ चेंडूत ९४ धावा केल्या. चला तर बघूया अटी तटीच्या सामन्यात कोण बाजी मारणार.