Wednesday, May 7, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Ind vs Pak: भारतीय लष्कर-हवाईदल आणि नौदलाची संयुक्त कारवाई आहे 'ऑपरेशन सिंदूर'...पाकला घरात घुसून ठोकले

Ind vs Pak: भारतीय लष्कर-हवाईदल आणि नौदलाची संयुक्त कारवाई आहे 'ऑपरेशन सिंदूर'...पाकला घरात घुसून ठोकले

नवी दिल्ली: भारताने दहशतवादाविरोधातील आपल्या लढाईला नवे वळण देताना ऑपरेशन सिंदूर लाँच केले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ऑपरेशन सिंदूर हे लष्कर, हवाईदल आणि नौदलाचे संयुक्त ऑपरेशन होते. यात दहशतवादी शिबीरांवर हल्ला करण्यासाठी शस्त्रांचा वापर करण्यात आला होता.


या ऑपरेशनमध्ये भारताच्या हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओके स्थित ९ दहशतवादी ठिकाणांनार स्ट्राईक केला. ही कारवाई रात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. हा एअरस्ट्राईक बहावलपूर, कोटली आणि मुझ्झफराबादमध्ये करण्यात आला.



भारताच्या स्ट्र्राईकनंतर पाकिस्तानचे उत्तर


भारताच्या एअरस्ट्राईकवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे विधान समोर आले आहे. शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की पाकिस्तानच्या जमिनीवर पाच ठिकाणी हल्ले करण्यात आले. पंतप्रधान शरीफ म्हणाले, पाकिस्तानला या कृत्याचे शक्तीशाली उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि याचे उत्तर दिले जात आहे .


पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव सुरू झाला होता. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निर्दोष लोकांचा बळी गेला होता. यानंतर भारताने सिंधु जल संधीला स्थगिती दिली होती. पाकिस्तानचे पाणी भारताने रोखले होते. तसेच अनेक वेळ भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी पहलगाम हल्ल्याला उत्तर दिले जाईल अशी शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कारवाईसाठी लष्कराला फ्री हँड दिला होता.

Comments
Add Comment