Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमीरायगड

मुंबई गोवा हायवेवर बर्निंग टेम्पोचा थरार!

मुंबई गोवा हायवेवर बर्निंग टेम्पोचा थरार!

माणगांव : मुंबई गोवा हायवेवर माणगांव येथे ५ मे च्या रात्री सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास खरवली फाटा हॉटेल ओपन अंब्रेला समोर एका बर्निंग टेम्पोचा जबरदस्त थरार माणगांव मधील वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी पहिला.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणगांव बाजुकडून मुंबई बाजूकडे मोठ्या गाड्यांचे (भंगार) इंजिन एयर फिल्टर घेऊन जाणारा आयशर ट्रक क्रमांक एमएच ०४ एमएच ५६९३ या गाडीला ५ मे च्या रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास फिल्टर वाहतूक होत असलेल्या वाहतूक टेम्पोला अचानक आग लागली. या आगीत सर्व माल जळून खाक झाला.


/>

सदर दुर्घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व सहकारी टीम तात्काळ दाखल झाली. माणगांव नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांसह नगरपंचायतचे डिजास्टर मल्टिपर्पज व्हेयिकल (अग्निशमन सह) दाखल झाल्याने पेटणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. आगीचे मुख्य कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.


यावेळी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह मयूर उभारे, जीवनदूत अनिकेत कांबळे यांनी वाहनाचे पूर्ण नुकसान होण्यापूर्वी जळणाऱ्या मालाला प्राणाची बाजी दाखवत बाहेर फेकले. त्यामुळे मोठी वित्तहानी व जीवितहानी टळली.


या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment