
मुंबई: आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीच्या काही सवयी त्याचे आयुष्य खराब करू शकतात. तसेच त्या व्यक्तीला आर्थिक तंगीही देऊ शकतात. जे लोक सतत कडवट बोलत असतात, वायफळ खर्च करत असतात तसेच सतत आळशीपणा करत असतात त्यांना अनेकदा समस्यांचा त्रास सहन करावा लागतो.
याशिवाय, मधुर वाणी आणि मेहनतीने व्यक्ती यश मिळवू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते आळखी व्यक्ती चांगली संधी वाया घालवतात. तर मेहनत करणाऱ्या मनुष्यावर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते.
जे लोक उगाचच वायफळ पैसे खर्च करतात त्यांना नेहमी आर्थिक समस्येचा ताण सहन करावा लागतो. समजुतीने खर्च केल्यास पैशांची बचत होते.
आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने चुकीच्या व्यक्तींपासून दूर राहिले पाहिजे. अशा लोकांसोबत वेळ घालवू नये तसेच ज्या व्यक्ती इतरांच्या चुगली करतात तसेच प्रत्येक गोष्टीवर चूक शोधत असतात त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे.
जर तुम्ही सतत स्वत:ची तुलना दुसऱ्यांसोबत करत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीच खुश राहू शकत नाही. अखेरीस आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही संकोचाशिवाय आपली गोष्ट दुसऱ्यासमोर ठेवायला हवी.