
मुंबई : इंडियन आयडॉल १२ चा विजेता आणि लोकप्रिय गायक पवनदीप राजनचा सोमवारी पहाटे सडेतीनच्या सुमारास अहमदाबादमध्ये मोठा अपघात झाला आहे. आणि त्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तो हॉस्पिटलमध्ये असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पवनदीपचे चाहते सोशल मीडियावरून त्याच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनेक कलाकार आणि इंडियन आयडॉलचे स्पर्धकही त्याच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करत आहेत.
या प्रकरणावर इंडियन आयडॉल १२ मधील दुसरी रनर-अप सायली कांबळे हिने झूम/टेली टॉक इंडिया या माध्यमाशी बोलताना सांगितले, “मी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क केला आहे. पण मला त्याच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती देण्याची परवानगी नाही.मी फक्त एवढंच म्हणू शकते की, त्याचे लवकरात लवकर स्वास्थ्य सुधारावे, हीच प्रार्थना आहे.”

मुंबई :अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात झालेल्या मेट गाला या फॅशन शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने तिचे पदार्पण केले आहे. कियारा गरोदर असून तिला ...
या प्रकरणावर इंडियन आयडॉल १२ मधील दुसरी रनर-अप सायली कांबळे हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. झूम/टेली टॉक इंडिया या माध्यमाशी बोलताना सायलीने सांगितले की, “मी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क केला आहे. पण मला त्याच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती देण्याची परवानगी नाही. मी फक्त एवढंच म्हणू शकते की, त्याचे लवकरात लवकर स्वास्थ्य सुधारावे, हीच प्रार्थना आहे.”
सध्या सोशल मीडियावर पवनदीपचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर आहे आणि डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. हा व्हिडिओ पाहून चाहते अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.प्राथमिक उपचारानंतर, पवनदीप आणि त्याच्या दोन्ही मित्रांना पुढील उपचारांसाठी नोएडाला हलविण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनदीपचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत आणि त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती सध्या नाजूक आहे.
पवनदीप राजनने २०२१ साली इंडियन आयडॉल १२ जिंकत संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केली. फिनालेमध्ये त्याने अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, निहाल टौरो आणि शन्मुखप्रिया यांना मागे टाकून विजेतेपद मिळवले. त्याने विजेतेपदासोबत एक कार आणि २५ लाख रुपयांचे बक्षीसही जिंकले होते. त्याने याआधी २०१५ साली द व्हॉईस इंडिया ही स्पर्धाही जिंकली होती. त्यावेळी प्रसिद्ध गायक शान हे त्याचे मेंटॉर होते. त्या स्पर्धेतही त्याने ५० लाख रुपये आणि एक कार मिळवली होती.