Tuesday, May 6, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

MI vs GT, IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स वानखेडे स्टेडियमवर महत्वपूर्ण लढत

MI vs GT, IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स वानखेडे स्टेडियमवर महत्वपूर्ण लढत

मुंबई(सुशील परब): मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स वानखेडे स्टेडियमवर आज महत्त्वपूर्ण लढत होत आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत समान गुणांवर आहेत (चौदा गुण) जो संघ विजयी होईल तो गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर जाईल. मुंबई इंडियन्सने सलग सहा विजय मिळविलेले आहेत, त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे. गुजरात टायटन्स पण काही कमी नाही त्यांनी दहा सामन्यात सात विजय मिळविलेले आहेत त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल यात शंकाच नाही.

रोहीत शर्मा, रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक बर्मा हे फलंदाज फॉर्मात आहेत त्यामुळे त्यांची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजीही चांगली होत आहे. जसप्रित बुमराह, टेंट बोल्ट, दोपक चहर, कर्ण शर्मा, मिचेल सेंटनर असे चांगले गोलंदाज मुंबईच्या संघात आहेत. गुजरात संघाला देखील कमी लेखून चालणार नाही त्यांचे साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, ज्योस बटलर, शाहरुख खान हे सातत्याने धावा करत आहेत.

गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, कैसिगो रबाडा, रशिद खान, वाशिग्टन सुंदर, प्रसिद्ध क्रिष्णा असे चांगले गोलंदाज आहेत वानखेडे स्टडियम हे फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल. अगोदरच्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव केला होता, आज मुंबई त्या पराभवाचा बदला घेणार? बघुया गुजरात टाषटन्स मुंबई इंडियन्सला रोखेल का की मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला हरवून सातवा विजय मिळवतो का ते पाहूया.

Comments
Add Comment