
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५६व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या सामन्यात टॉस जिंकत गुजरातच्या संघाने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १५५ धावा केल्या. दरम्यान, विजयासाठी १५६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या गुजरातने जबरदस्त सुरूवात केली. गुजरातची धावसंख्या १४ षटकांत २ बाद १०७ वर असताना पावसाचा व्यत्यय आल्याने सामना थांबवावा लागला आहे.
असा होता मुंबईचा डाव
पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या मुंबईची सुरूवात खराब राहिली. पहिल्याच षटकांत दुसऱ्या बॉलवर सिराजने रिकल्टनला बाद केले. रिकल्टनने केवळ २ धावा केल्या. यानंतर विल जॅक्सने जबरदस्त शॉट लगावत मुंबईला सांभाळण्याचा प्रयत्न केला.मात्र चौथ्या षटकांत रोहित शर्मा अर्शद खान शिकार बनला. रोहितने केवळ ७ धावा केल्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स यांनी मुंबईला सांभाळले. दोघांनी दिमाखदार फलंदाजी केली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र ११व्या षटकांत सूर्यकुमार यादव ३५ धावा करून बाद झाला.
यातच विल जॅक्सने २९ बॉलमध्ये शानदार अर्धशतक ठोकले. मात्र १२व्या षटकांत विल जॅक्सने आपली विकेट गमावली. जॅक्सने ५३ धावा केल्या. यात ३ षटकारांचा समावेश होता. मात्र यानंतर कर्णधार हार्दिककडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो एक धाव करून बाद झाला.