
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. यातच सोशल मीडियावर भडकावणारी तसेच अपमानजनक पोस्ट शेअर केले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये यात कारवाईही झाली मात्र आता याबाबत संसदेच्या स्थायी समितीने रिपोर्ट जारी केला आहे.
संसदेच्या स्थायी समितीने म्हटले की, २२ एप्रिल २०२५मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात काही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्म राष्ट्रहिताविरोधात कार्य करत आहे. यामुळे हिंसा भडकू शकते.
Parliamentary Standing Committee on Information Techonology Branch says, "Post terror attack in Pahalgam on 22 April, 2025 some social media influencers and social media platforms in the country seem to be working against the interest of the country which is likely to incite…
— ANI (@ANI) May 5, 2025
काय म्हटलेय समितीने?
समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाला विनंती केली आहे की, देशहिताविरोधात काम करणारे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर आयटी कायदा २००० आणि सूचना प्रौद्योगिकी नियम २०२१ अंतर्गत अशा प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यासाठी काय कारवाई करण्यात आली आहे आणि काय केली जाणार आहे, याची माहिती दिली जावी.
८ मे पर्यंत मागितले उत्तर
रिपोर्ट्सनुसार समितीने ८ मेपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाकडून माहिती घेण्यास सांगितले आहे.