
अमरावती : विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुट्टी सुरु (Summer Holiday) झाली असून याकाळात अनेकजण कुटुंबासह किंवा मित्रपरिवारासह विविध ठिकाणी फिरायला जातात. सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्रातील अभ्यारण्यांना भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र यावेळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत (Melghat Jungle Safari) येणारी शहानूर येथील जंगल व नरनाळा किल्ला सफारीला जाणाऱ्या पर्यटकांकडून नाराजीचा सूर मारला जात आहे. मे महिना सुरु होताच तीन दिवस मेळघाट सफारी बंद असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

मुंबई : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोटवन्यजीवविभागामध्येनरनाळा किल्ला व शहानूर येथील जंगलाचा समावेश आहे. नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी शहानूर येथे वन पर्यटन केंद्र असून त्या ठिकाणावरून नरनाळा किल्ला व शहानूर जंगलासाठी सफारी केली जाते. यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून ही सफारी बंद आहे. १ मे पासून वन पर्यटन संघटनेच्या जिप्सी चालकांनी भाडेवाढ करण्याच्या मागणीसाठी बंद पुकारला. पेट्रोलचे वाढलेले दर लक्षात घेता व पर्यटन मार्गात नव्याने वाढ झाल्यामुळे स्थानिकांचा रोजगार देखील बुडात चालला आहे. त्यामुळे शहानूर सफारीचे केवळ जिप्सीप्रवास भाडे अडीच हजारावरून चार हजार व नरनाळा किल्ला सफारीचे दीड हजारावरून अडीच हजार करण्याची मागणी संघटनेने केली. (Melghat Jungle Safari)
काय आहेत मागण्या?
करोना काळामुळे बंद केलेली रात्रीची सफारी व पूर्ण दिवसाची सफारी सुरू करण्यात यावी, नरनाळा परिक्षेत्रातील बफर क्षेत्रात मचाण सुरू करावे, शहानूर सफारी द्वारावरील गाईड व जिप्सी चालक यांनागणवेश व ओळखपत्र द्यावे, शहानूर सफारी मार्गावरील खासगी सर्व वाहने बंद करण्यात यावी, शहानूर सफारी द्वार ते नरनाळा किल्ला दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण होत असल्यामुळे पावसाळ्यात नरनाळा किल्ला सफारी सुरु ठेवावी, जिप्सी गाईड व जिप्सी चालक यांना प्रशिक्षण देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने अकोट वन्यजीव विभागात देण्यात आले. (Melghat Jungle Safari)