Sunday, May 4, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर 'सर्वोच्च' सुनावणी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर 'सर्वोच्च' सुनावणी

नवी दिल्ली : पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह या वादावर तोडगा काढून निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले. तसेच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे जाहीर केले. या निर्णयांविरोधात उद्धव आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मे महिन्यात उद्धव आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे

उद्धव गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे / शिउबाठा) शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात ७ मे रोजी शिवसेना कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून धनुष्यबाण वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शरद पवार गट (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार / राशप) राष्ट्रवादी काँग्रेस या नावावर आणि गजराचे घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि गजराचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात १४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून गजराचे घड्याळ वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment