
मुंबई(ज्ञानेश सावंत): आज लखनऊ आणि पंजाव धर्मशाळा येथे पात्रता फेरीत पुढे जाण्यासाठी लढणार आहेत. लखनऊकडे सध्या १० गुण आहेत, तर पंजावकडे १३ गुण आहेत दोन्ही संघाना पात्रता फेरीत जाण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक संघ जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असेल.
पहिल्या फेरीत पंजाबने लखनऊया ८ बळीनी पराभव केला, त्यामुळे पंजाब पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करण्याची शक्यता आहे. शिवाय धर्मशाळा हे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे त्यामुळे पणायला लखनऊपेक्षा अधिक चांगली संधी आहे. सध्या लखनऊच्या फलंदाजीत सातत्य नसल्यामुळे आजच्या सामन्यात पंजाबला संधी मिळू शकते. या अगोदरच्या सामन्यात युजवेंद्र चहलने आपली फिरकीची छाप पाडली व हॅटट्रिक घेतली आहे.
लखनऊबद्दल बोलायचे झाल्यास कर्णधार पंतला पूर्ण हगामात साजेशी खेळी करता आलेली नाही. पुरन सुरुवातीला चांगली फलंदाजी करत होत्ता; परंतु आता त्याच्याकडून तेवढ्या धावा होत नाहीत. त्यामुळे साहजिकच सर्व जबावदारी मार्श, मार्कस व बदोनी यांच्यावर येऊन पडते. मिलर संपूर्ण हंगामात चांगली फलंदाजी करू शकला नाही त्यामुळे लखनऊच्या फलंदाजीत कमकुवता दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊयात पात्रता फेरीत कोण दावेदार ठरते.