
स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग क्षेत्रात अतुलनीय कार्य केले शिवाय वंचितांसाठी आयुष्य वेचले. योग आणि मानवतावादी कार्यातील योगदानासाठी २०२२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौविण्यात आले होते. स्वामी शिवानंद त्यांच्या साधेपणा, शिस्त आणि भक्तीसाठी ओळखले जात. आयुष्यभर त्यांनी स्वतःची कामं स्वतःचं करणं पसंत केलं. ते १२९ व्या वर्षीही योगासने करत होते. स्वामी शिवानंद बाबा १२९ वर्षे जगले. आम्ही १९९८ पासून त्यांना भेटत होतो. ते एक महान आत्मा होते जे सर्वांना समानतेने वागवत होते. १२९ व्या वर्षी त्यांनी असे योग केले जे आमच्या वयाचे लोकही करू शकत नाहीत; असे धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले. टिंकू हे स्वामी शिवानंद सरस्वती यांचे शिष्य आणि मागील अनेक दशकांपासूनचे स्वामींचे शेजारी आहेत. स्वामीजी भेदभाव न करता सर्वांना अभिवादन करायचे. ते कधीही कोणावर अवलंबून नव्हते. साधे, स्वावलंबी आणि शिस्तीचे जीवन जगण्यावर त्यांनी भर दिला, असेही धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले. स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग साधना केली. तसेच गरीब, कुष्ठरोगी, वंचित यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर काम केले; असे स्वामींचे अनुयायी परिमल मुखर्जी म्हणाले.योग साधक और काशी निवासी शिवानंद बाबा जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। योग और साधना को समर्पित उनका जीवन देश की हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा। योग के जरिए समाज की सेवा के लिए उन्हें पद्मश्री से सम्मानित भी किया गया था।
शिवानंद बाबा का शिवलोक प्रयाण हम सब काशीवासियों और उनसे… pic.twitter.com/nm9fI3ySiK — Narendra Modi (@narendramodi) May 4, 2025