Sunday, May 4, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

अमुल पाठोपाठ गोकुळचे दूध महागले

अमुल पाठोपाठ गोकुळचे दूध महागले

मुंबई : 'अमुल' पाठोपाठ 'गोकुळ'चे दूध महागले. महाराष्ट्र दिनापासून 'अमुल'ने म्हैस आणि गायीच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. तसेच अर्धा लिटरच्या म्हैस आणि गायीच्या दुधाच्या किमतीत एक रुपयाची वाढ केली. आता 'गोकुळ'च्या दुधाच्या दरात वाढ झाली आहे. कोल्हापूर दूध उत्पादक संघाने पत्रक काढून दरवाढ जाहीर केली. कोल्हापूरातून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात वितरीत होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवे दर ४ मेपासून लागू झाले आहेत. टोण्ड ताजा आणि गोकुळ शक्तीच्या दुधाच्या किंमतीत कोणताही बदल नाही.

गोकुळ ब्रँडच्या फुल क्रीम क्लासिक दुधाची किंमत प्रति लिटर ७४ रुपये झाली आहे. तर फुल क्रीम दुधाची किंमत पाच लिटरच्या पॅकसाठी ३६५ रुपये असेल. गाय दूध सात्विक या दुधाची किंमत प्रति लिटर ५८ रुपये असेल. दरवाढीमुळे दूध उत्पादकांना फायदा होणार आहे आणि ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

गोकुळ दुधाचा प्रामुख्याने कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खप होतो. यामुळे या जिल्ह्यांतील 'गोकुळ'च्या ग्राहकांच्या खिशावर दूध दरवाढीचा ताण येणार आहे. ग्राहकांना दुधासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Comments
Add Comment