Jammu Kashmir Accident : लष्कराचा ट्रक ७०० फूट खोल दरीत कोसळला! ३ जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) रामबन जिल्ह्यात आज मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी चष्मा येथे लष्कराची गाडी घसरुन थेट ७०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात (Jammu Kashmir Accident) घडला. या घटनेत तीन सैनिकांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर लगेच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. तसेच पोलिसांनी या घटनेची एफआयआर दाखल केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.४) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरून २०० ते ३०० मीटर दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. अपघअताची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस, सैन्य आणि स्थानिक स्वयंसेवकांनी एकत्र मिळून बचाव कार्य सुरु केले. या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला असून ट्रकमधील उपस्थित असलेल्या तीन जवानांचा मृत्यू झाला. अमित कुमार, सुजित कुमार आणि मान बहादूर असे तिन्ही जवानांचे नाव असून या तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला.



अपघाताचे कारण काय?


गेल्या काही दिवसांपासून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामसू-रामबन भागात खूप पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. भूस्खलनामुळे काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. महामार्गाची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी परत सुरू करण्यात आला आहे. तरीही, ४० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा रामबन-रामसू पट्टा अजूनही धोकादायक आहे. हा जवळपास ३०० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा एक कमजोर भाग आहे.



यापूर्वीही घडला होता अपघात


जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांशी संबंधित ही सहा महिन्यांतील तिसरी घटना आहे. यापूर्वी, ४ जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यातील एसके पायीन भागात सहा जवानांना घेऊन जाणारा लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता आणि दोन गंभीर जखमी झाले होते. (Jammu Kashmir Accident)

Comments
Add Comment

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील