
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील एकमेव भूमिगत स्थानक असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकाचे ७६ टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत १४.२ लाख घनमीटर मातीचे खोदकाम पूर्ण झाले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी बुलेट ट्रेनच्या मुंबई स्थानकाच्या कामाची पाहणी केली. जपानमधील बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशात पहिम्या मुंबई अहमदावाद दरम्यानच्या ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम करीत आहे, महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये बुलेट ट्रेनची कामे सुरू आहेत. या मार्गातील मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे २१ किमी लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुल शीळफाटा बोगदा, समुद्राखालील ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आणि भूमिगत बोगद्याची कामे वेगाने करण्यात येत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल-शिळफाट्या दरम्यान २१ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ठाणे खाडीतील ७ किमी लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे.
बुलेट ट्रेनसाठी खोदण्यात येणारा बोगदा अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गासाठी एकच असणार आहे. सी-२ पंकजमध्ये बोगद्याजवळ २७ ठिकाणांवर ३९ उपकरणांच्या खोलीची निर्मिती केली आहे. बोगद्यासाठी १३.१ मोटर व्यासाच्या कटर हेड टीबीएम यंत्राचा वापर केला जात आहे. बोगद्याच्या २१ किमीपैकी १६ किमी भागासाठी तीन टनेल बोअरिंग मंत्रांचा वापर करण्यात आला असून उर्वरित ५ किमीच्या भागासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. हा बोगदा जमिनीपासून सुमारे २५ ते ६५ मीटर खोल आहे. त्याचा सर्वांत खोल भाग शिळफाटाजवळ पारसिक डोंगराच्या खाली ११४ मीटर जमिनीखाली असेल, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पूर्णत्वाची तारीख जाहीर केली नाही वांद्रे-कुर्ला संकुलासह महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनचे काम पूर्ण वेगाने सुरू आहे, असे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितले. तथापि, त्यानी प्रकल्पाची पूर्णत्वाची तारीख जाहीर केली नाही.