
पुणे : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उकाडा (Heat) वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसून येत आहे. अशातच नागरिकांना पाण्याची कमतरता भासत असून पाणीटंचाईचा (Water Crisis) देखील सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. (Pune Water Shortage)

मुंबई: बँकिंग नियामकाने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पाच बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. ज्यामध्ये ...
पुणे महापालिकेने शहराच्या दक्षिण भागात पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे. या भागातील पाणीपुरवठा आता आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर कात्रज, कोंढवा, भारती विद्यापीठ या भागांमध्ये गेल्या दीड महिन्यापासून दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात होता. त्यावर आता महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचे वेळापत्रक प्रसिद्ध करून शिक्कामोर्तब केले आहे.
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितल्यानुसार, वडगाव बुद्रुक पाणीपुरवठा केंद्रातून कात्रज, आंबेगाव, धायरी, तसेच सिंहगड रस्त्यावरील भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या भागासाठी उपलब्ध होणारे पाणी कमी पडत असल्याने कात्रज परिसरातील पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे आल्या आहेत. या सर्व भागांमध्ये पुरेशा दाबाने पाणी देण्यासाठी आता आठवड्यातून एक दिवस वेगवेगळ्या भागांतील पाणी बंद ठेवले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून (५ मे) केली जाणार आहे. या भागात चक्राकार पद्धतीने पाणी दिले जाणार आहे. (Pune Water Shortage)
कधी आणि कुठे असणार पाणीपुरवठा बंद?
- सोमवार : बालाजीनगर, श्रीहरी सोसयाटी, गुरुदत्त सोसायटी, साईकृपा सोसायटी, पवार रुग्णालय, कात्रज परिसर, कोंढवा, साईनगर, शांतीनगर सोसायटी, महानंदा सोसायटी, श्रीकृष्ण काॅलनी.
- मंगळवार : संपूर्ण सन सिटी परिसर, माणिकबाग, समर्थ नगर, मधुकर हाॅस्पिटल परिसर, विठ्ठलवाडी, जुनी धायरी, बारंगणी मळा, पारी कंपनी रस्ता, राजस सोसायटी कात्रज, निरंजन सोसायटी, कमला सिटी, कोंढवा खडी मशीन चौक, सिंहगड महाविद्यालय, हब टाउन सोसायटी, कोलते पाटील सोसायटी.
- बुधवार : वडगाव बुद्रुक, वडगाव हिंगणे, जाधवनगर, वडगाव गावठाण, जाधवनगर, हिंगणे, महादेवनगर, राजीव गांधी वसाहत, कात्रज वाघजाईनगर, सुखदा-वरदा सोसायटी, आंबामाता मंदिरामागील परिसर, सिल्व्हर ओक सोसायटी, सुखसागर नगर, स्वामी समर्थनगर.
- गुरुवार : धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, चित्तविहारी सोसायटी, अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई पठार, सन्मित्र सोसायटी, सागर सोसायटी, सहकारनगर भाग १, दाते बसस्टॉप, सुखसागरनगर भाग १, निलया सोसायटी, महादेवनगर भाग – २, कोंढवा, गोकुळनगर, वृंदावननगर.
- शुक्रवार : आंबेगाव पठार, दत्तनगर भुयारी मार्ग, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, जोगेश्वरीनगर, मोरे-निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर. आगम मंदिर संतोषनगर वंडर सिटी परिसर, साईनगर, कोंढवा बु. (गावठाण), कपिलनगर, लक्ष्मीनगर, आचल फार्म.
- शनिवार : कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखिल नवीन वसाहत कात्रज, राजीव गांधी वसाहत, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क.
- रविवार : कात्रज महादेवनगर भाग १, आनंदनगर, महावीर नगर, शिव प्लाझा पिसोळी रस्ता, पारगे नगर, आंबेडकरनगर, पुण्यधाम आश्रम रस्ता. (Pune Water Shortage)