
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) शून्य गुरुत्वाकर्षणावर नृत्य करणाऱ्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita William) आणि डॉन पेटिट (Don Petit) यांचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ जगासमोर आला आहे. ज्यामध्ये हे दोघही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये डान्स करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये विलियम्स आणि पेटिट आयएसएसच्या मॉड्यूल्समधून अलगद तरंगत, आनंदाने फिरत आणि रोमँटिक डान्स करत आहेत. त्यांच्या हालचालीमध्ये सहजता आणि आनंद स्पष्ट दिसतो. या व्हिडिओने जागतिक अंतराळप्रेमींना केवळ मिशनच्या गंभीरतेचा नव्हे तर त्यातील हलक्याफुलक्या क्षणांचा देखील प्रत्यय दिला आहे.
सुनिता विलियम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर असून त्यांनी आतापर्यंत ३ अंतराळ मोहिमा पूर्ण केल्या आहेत. दरवेळी आयएसएसमध्ये प्रवेश करताना त्या एका छोट्याशा डान्सद्वारे मोहिमेची सुरुवात करत असल्याचं अनेक व्हिडिओमधून पाहायला मिळालेलं आहे. आता ही सवय त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये देखील लोकप्रिय झाली आहे.
“Two Steppin on the Moon”; Country Western singer Josh Turner @joshturnermusic visited Houston Mission Control and sang us this song. Suni Williams and I decided to give it a try while Butch Wilmore filmed the effort. Here is “Two Steppin in Space”. Big thanks to Josh Turner… pic.twitter.com/PVQJOYz0H1
— Don Pettit (@astro_Pettit) April 16, 2025
डॉन पेटिट हे देखील नासाचे अनुभवी अंतराळवीर असून त्यांनी त्यांच्या विज्ञानातील योगदानासोबतच मोहिमेतील सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने सहकाऱ्यांचं मनोबल कायम उंच ठेवलं.

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी घातली आहे. पाकिस्तानमधील ...
सुनीता विल्यम्स नुकत्याच नऊ महिन्यांहून अधिक काळ चालू असलेल्या मोहिमेनंतर पृथ्वीवर परतल्या. त्यांचे ही मिशन साधारण नऊ महिन्यांचे होते. जे मूळ नियोजनाच्या तुलनेत फार जास्त होतं. Starliner अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे हे मिशन लांबणीवर गेले फेब्रुवारी मध्ये सुनीता पृथ्वीवर परतल्या आहेत.