
मुंबई : सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो. १६ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. टीझरमध्ये या तिघांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली होती, पण ट्रेलरमध्ये हा प्रवास नेमका कशासाठी सुरू होतो, याचे धागेदोरे उलगडताना दिसत आहे. समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी हे तीन मित्र सिक्कीमकडे निघतात. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतो. जो त्यांच्या मैत्रीत, आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो. पण तो अनुभव नेमका काय आहे ? हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. चित्रपटातील सिक्कीमचे अप्रतिम लोकेशन्स आणि दोन पिढ्यांतील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते.

पुणे : कायम गजबजलेल्या स्वारगेट बस डेपोमध्ये एका बंदमध्ये बलात्काराची घटना घडली. या प्रकारात आरोपी असलेल्या दत्ता गाडेची इंटरनेट हिस्टरी पोलिसांनी ...