
मुंबई : मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे. आपल्या चित्रपटाची कथा लोकांपर्यंत पोहचावी यासाठी चित्रपटाची टीमही तितकीच मेहनत घेत असते. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता विजय निकम याने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याच्या नव्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चर्चेचे कारणही तसंच आहे. ‘वीजी फिल्म्स’च्या 'आतली बातमी फुटली' चित्रपटात एका भाईची भूमिका तो साकारणार आहेत. ‘टायगरभाई’ असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

मुंबई: मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा कामाच्या अतिरिक्त ताणामुळं मूक निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. ज्यामुळे सोमवारी ...
काय म्हणाला अभिनेता विजय निकम ?
मी साकारलेला ‘टायगरभाई’ हा चित्रपटात खूपच धमाल करताना दिसणार आहे. भूमिका ग्रे शेडची असली तरी माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे सोबत त्यात विनोदी बाज असल्याने ही भूमिका करायला मजा आली. मला ‘टायगरभाई’ च्या भूमिकेत पाहणं चाहत्यांना सुद्धा आवडेल यात शंका नाही. एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदा भोवती 'आतली बातमी फुटली' या सिनेमाची कथा फिरते. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकार या चित्रपटात धमाल उडवणार आहेत.
'आतली बातमी फुटली' या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.