Saturday, May 3, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

शिर्डीच्या साई संस्थान मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस तपास सुरू

शिर्डीच्या साई संस्थान मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस तपास सुरू
शिर्डी : शिर्डीच्या साई संस्थान मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने ई मेल करुन ही धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. शिर्डीच्या साईबाबांचे जगभर लाखो भक्त आहेत. हे भक्त शिर्डीत साई संस्थान मंदिरात येऊन साईबाबांना पाया पडणे पसंत करतात. दररोज शिर्डीच्या साई संस्थान मंदिरात भाविकांची रिघ लागलेली असते. महत्त्वाच्या दिवशी साईचरणी लीन होण्यासाठी लाखो भक्त येतात. यामुळे मंदिरासाठी कायमस्वरुपी बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. शिफ्ट ड्युटी स्वरुपात २४ तास आठवड्याचे सातही दिवस मंदिराचे संरक्षण केले जाते. पण धमकीला ई मेल आल्यामुळे सुरक्षा रक्षकांचा ताफा आणि शिर्डी पोलीस यांच्या कामात वाढ झाली आहे. इ मेल नेमका कोणी केला याचा तपास सुरू आहे. मंदिराच्या बंदोबस्ताचा अधिकाऱ्यांनी नव्याने आढावा घेतला आणि तो आणखी चोख केला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस इ मेल नेमका कोणी केला याचा शोध घेत आहेत. संपूर्ण मंदिरात तसेच मंदिराबाहेर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. संशयास्पद हालचाल आढळल्यास सुरक्षा रक्षक लगेच घटनास्थळी जाऊन तपासणी करत आहेत. संपूर्ण मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment