Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पाऊस केरळमध्ये १ जूनला तर महाराष्ट्रात ७-८ जूनला होणार दाखल

पाऊस केरळमध्ये १ जूनला तर महाराष्ट्रात ७-८ जूनला होणार दाखल

मुंबई : मागील वर्षीप्रमाणे, यंदाही मान्सून शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे. मान्सूनवर एल निनो, ला निना किंवा हिंद महासागरातील द्विध्रुवीय घटकांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका आणि वेळेत दाखल होईल, अशी माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संशोधक आणि मान्सून अभ्यासक डॉ. एम. आर. रमेश कुमार यांनी दिली आहे.

ते म्हणाले, स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनचा पूर्व अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापुढील अनुमान १५ मे दरम्यान व्यक्त करण्यात येईल. यात मान्सूनची एकूण अचूकता स्पष्ट होईल.

यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका बरसेल आणि केरळमध्ये वेळेत दाखल होईल. १ ते ६ जून दरम्यान मान्सून गोव्यात दाखल होईल आणि ७ किंवा ८ जूनला तो महाराष्ट्रात सुरू होईल, असे डॉ. एम. आर. रमेश कुमार यांनी सांगितले.

Comments
Add Comment