
मुंबई : तापमानाचा पार वाढत चालला असल्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या सुमारास घराबाहेर पडताना अंगाला उन्हाचे चटके बसत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा (Unseasonal Rain) अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather)

बंगळुरू: एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी आरसीबी विरुद्ध सीएसके (RCB Vs CSK) अशी लढत रंगणार आहे. आयपीएलच्या (IPL 2025) या सामन्यात साऱ्यांच्या नजरा विराट ...
सध्या चक्राकार वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रालगतच्या राजस्थान आणि मध्यप्रदेशात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सागर किनारपट्टीलगतचा भाग वगळता उर्वरित राज्यात उद्या ४ मे ला वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. तर ५ आणि ६ मे ला संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Weather Update)
दरम्यान, विदर्भातील नागपूरसह वर्धा आणि भंडारामध्ये पुढील काही तास ढगाळ वातावरण राहणार असून वादळी वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर पुढील २ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. यामध्ये वीजांच्या गडगडाटाचीही शक्यता आहे. ४० ते ५० किमी ताशी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कधी आणि कुठे बरसणार अवकाळी पाऊस?
४ मे : नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत येलो अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हामध्ये पावसाची शक्यता.
५ मे : संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा.
६ मे : सातारा, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उर्वरित ठिकाणी हलक्या सरीचा अंदाज.
७ मे : संपूर्ण कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व बहुतांश मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा.