Saturday, May 3, 2025

देशताज्या घडामोडी

HBL Bank: सीमा क्षेत्रातील बँका आणि एटीएम बंद, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय!

HBL Bank: सीमा क्षेत्रातील बँका आणि एटीएम बंद, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय!

जम्मू आणि काश्मीर: पाकिस्तानी बँक एलओसीच्या जवळील आपल्या शाखा बंद करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी बँक हबीब बँक लिमिटेडने (HBL Bank) नियंत्रण सीमा रेषेनजीक असलेल्या सर्व शाखा बंद केल्या आहेत. यामागील कारण सीमेवरील तणाव असल्याचे सांगितले जाते.

पाकव्याप्त काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील रक्कड धार बाजारची शाखा कालपासून अचानक बंद करण्यात आली, आणि त्याबाहेर "सीमा क्षेत्रातील सुरक्षा समस्यांमुळे बँका आणि एटीएम बंद आहेत" अशी सूचना लावण्यात आली. स्थानिकांचा असा दावा आहे की, हाजिरा, खाई गाला आणि तराखलच्या शाखा कधीही बंद होऊ शकतात. याला कारणीभूत पाकिस्तान सैन्याकडून सीमारेषेवर केला जात असलेला गोळीबार असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तान सैन्याकडून सीमारेषेवर गोळीबार

गेल्या आठवड्यात पाकिस्तानी सैन्याने १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, ज्यामध्ये कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरचा देखील समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध उचललेल्या कठोर कारवाईमध्ये, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भारतीय लष्कराच्या तिन्ही गटांना फ्री हॅन्ड दिला आहे. यामुळे भारत कधीही युद्ध करू शकते अशी भीती पाकिस्तानला आहे. या भीतीपोटी पाकिस्तान सीमा रेषेवर गोळीबार करत आहे. ज्याला भारतीय सैन्याकडून देखील प्रत्युत्तर मिळत आहे.

 
Comments
Add Comment