
राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार दर्शन
कणकवली - करंजे येथील गोवर्धन गो शाळेचे करणार उद्घाटन
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या ११ मे रोजी सिंधुदुर्ग दोरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मालवण शहरातील (Malvan) राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रविवारी, ११ मे रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिट ते १ वाजून ३० मिनिटांदरम्यान दर्शन घेणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. पुतळा दर्शन नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी २ वाजता कणकवली तालुक्यातील करंजे येथील कै. तातू सिताराम राणे संचलित गोवर्धन गो शाळेचे उद्घाटन करणार आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सातत्याने अपघात घडल्याच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये सांस्कृतिक राजधानी मानली जाणाऱ्या पुणे शहराचं ...
६० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारणार
उभारण्याच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे.राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीस कामाचे कार्यादेश निर्गमित केलेले आहेत. पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर झालेले आहे. तलवारधारी पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात येत आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात येत आहे. चौथऱ्यासाठी एम ५० या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे. या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबई या तज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात आलेले आहे.
गोवर्धन गोशाळेत अनेक जातींच्या गाईंचा समावेश
कणकवली तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचे उद्घाटन ११ मे रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील वेगळी अशी ही गोशाळा असणार असून येथे देशभरातील विविध प्रकारच्या गाई पाळल्या जातील. या ठिकाणी गीर जातीची तसेच इतर अनेक जातींच्या गाई असणार आहेत. लातूरचीही देखणी गाय असणार आहे. सध्या ८० गीर गाई आहेत, आणखी २० येणार आहेत.