
मुंबई : लोकसभा संपली, विधानसभाही पार पडली… आता देशातील लक्ष वेधणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची चाहूल लागली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून बीएलओ नियुक्त्या सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ‘मुंबई महापालिका निवडणूक लवकरच’ या शक्यतेला राजकीय वर्तुळात बळ मिळाले आहे.
६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी याचिकांवर सुनावणी होणार आहे. हाच दिवस निवडणुकांचा संभाव्य रोडमॅप स्पष्ट करणारा ठरू शकतो. पण त्याआधीच प्रशासनाने बीएलओ कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. काही कर्मचाऱ्यांना तर "नाही रुजलात तर कायदेशीर कारवाई" असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई: मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा कामाच्या अतिरिक्त ताणामुळं मूक निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. ज्यामुळे सोमवारी ...
कोरोनाकाळानंतर मुंबई महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. पण निवडणूक तयारीच्या नावाखाली सुरू झालेली बीएलओ नियुक्ती ही निवडणूक रणसंग्रामाची पहिली घंटा मानली जात आहे.
BLO म्हणजे कोण?
मतदान केंद्रांच्या यादीतील नावांची शुद्धता, नविन मतदारांची नोंदणी, अनधिकृत नावे वगळणे ही जबाबदारी BLO म्हणजे Booth Level Officer पार पाडतात. एका BLOकडे दोन केंद्रांची जबाबदारी असते, आणि ही नियुक्ती निवडणुकीच्या यंत्रणेतील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असते.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मात्र "ही तयारी म्हणजे निवडणूक निश्चित असल्याचे संकेत नाहीत," असे म्हणत अधिकृत खुलासा टाळला. मात्र, राजकीय गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.