
पुणे : कायम गजबजलेल्या स्वारगेट बस डेपोमध्ये एका बंदमध्ये बलात्काराची घटना घडली. या प्रकारात आरोपी असलेल्या दत्ता गाडेची इंटरनेट हिस्टरी पोलिसांनी तपासली. ही हिस्टरी बघितल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. आरोपी दत्ता गाडेने एका वर्षात २२ वेळा अश्लील व्हिडीओ बघितल्याचे तपासातून उघड झाले.
आरोपीने तरुणीला खोटं बोलून अंधारलेल्या भागात उभ्या असलेल्या आणि दिवे बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगितले. मागोमाग दत्ता गाडे बसमध्ये गेला त्याने बसचा दरवाजा आतून बंद केला. यानंतर आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणात तरुणीने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
आरोपीने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला पोलिसांनी विरोध केला आहे. विरोध करण्याचे कारणही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. तपासाचा भाग म्हणून आरोपीचा मोबाईल जप्त केला. या मोबाईच्या मदतीने आरोपीची इंटरनेट हिस्टरी तपासली. या हिस्टरीतून दत्ता गाडे सतत अश्लील व्हिडीओ बघायचा हे उघड झाले. आरोपी तरुणींकडे कसे बघायचा हे इंटरनेट हिस्टरी तपासल्यावर लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधी त्याने रस्त्यात महिलांना अडवणे, महिलांशी गोड बोलून त्यांना गाडीत बसवून आडमार्गाने नेणे असे प्रकार घडल्याच्या तक्रारी होत्या. स्वारगेट प्रकरणातही असाच प्रकार घडला होता. तरुणीला खोटं बोलून अंधारलेल्या भागात उभ्या असलेल्या आणि दिवे बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगितले होते. तरुणीच्या मागोमाग बसमध्ये गेल्यानंतर आरोपीने बसमधून बाहेर पडण्याचे सर्व दरवाजे पटकन आतून बंद केले. यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या संदर्भात तरुणीने तक्रार दिली आहे.
तपासातून हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपी अनेकदा स्वारगेट डेपोत जात - येत होता. यामुळे जामीन मिळाल्यास आरोपी पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता आहे, असे सांगत पोलिसांच्यावतीने आरोपीच्या जामिनाला विरोध करण्यात आला आहे.