
श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देश हादरुन गेलं आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्यासह अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकिकडे भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरली असताना दुसरीकडे पाकिस्तानला नैसर्गिक आपत्तीचा देखील सामना करावा लागणार आहे.

मंगळुरू : कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यापासून दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरूत ...
सध्या जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून यामुळे पाकिस्तानमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे (४०-६० किमी/ताशी) वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात आला होता पूर
गेल्या महिन्यात २६ एप्रिल २०२५ रोजी भारताने पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हट्टिन बाला भागात झेलम नदीत पाणी सोडले होते. यामुळे मुझफ्फराबादमध्ये अचानक मोठा पूर आला होता. यानंतर, मुझफ्फराबाद प्रशासनावर वॉटर इमर्जन्सी जाहीर करण्याची वेळ आली होती.
दिल्लीत पावसाचा कहर
सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दिल्ली-एनसीआरमध्ये आपत्तीचे रूप धारण केले. दिल्लीतील द्वारका येथे पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका घरावर झाड कोसळले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खारखरी कालवा गावात एका शेतात बांधलेल्या ट्यूबवेलच्या खोलीवर एक झाड पडले. या खोलीत एकूण पाच लोक झोपले होते. ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. मृतांची ओळख २६ वर्षीय ज्योती आणि तिची तीन मुले अशी झाली आहे. तर ज्योतीचा पती अजय किरकोळ जखमी झाला आहे.