
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच ३० एप्रिल २०२५ पर्यंत मिळणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र एप्रिल महिना उलटून २ दिवस झाले असले तरी अद्यापही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेरमधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. पठाण खान असे या गुप्तहेराचे नाव आहे. तो भारताशी संबंधित महत्त्वाची ...
मागील महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाचवेळी देण्यात आला होता. त्याचप्रमाणे यावेळीही एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकाचवेळी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला देणार याबाबत आदिती तटकरे () लवकरच घोषणा करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे (Ladki Bahin Yojana) मे महिन्याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न २.५० लाखांहून कमी असणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना (Maharashtra Women) ९ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का आणि कधी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
लाडक्या बहिणींना २१०० कधी मिळणार?
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही २१०० रुपये देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे २१०० रुपये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)
८ लाख लाडक्या बहिणींचा हप्ता कपात
सरकारच्या नियमानुसार, एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एका योजनेचा फायदा घेता येतो. पण मागील काही काळात अनेक महिला एकाचवेळी शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले. या प्रकाराची सरकारने छाननी केली असून, ज्या महिला दोन्ही योजना घेतात त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळतील, असा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे सुमारे ८ लाख लाभार्थी महिलांवर परिणाम होणार आहे. (Ladki Bahin Yojana)