Saturday, October 25, 2025
Happy Diwali

नॅशनल हेराल्ड : सोनिया, राहुलसह ६ जणांना कोर्टाची नोटीस

नॅशनल हेराल्ड : सोनिया, राहुलसह ६ जणांना कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज, शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना नोटीस बजावली. यासोबतच इतर ६ जणांनादेखील नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.

विशेष न्यायाधीश (पीसी कायदा) विशाल गोगणे यांनी सोनिया आणि राहुल गांधींसह सॅम पित्रोदा, सुमन दुबे, सुनील भंडारी, मेसर्स यंग इंडिया आणि मेसर्स डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड यांनाही नोटीस बजावली आहे. न्यायाधीश गोगणे म्हणाले की, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या आरोपपत्रात ज्यांची नावे दिली आहेत, त्यांना नोटीस बजावताना सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण हे काँग्रेस पक्षाने नॅशनल हेराल्डचे मालक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांना ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात 'यंग इंडियनला दिलेल्या ९० कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित आहे.

एका इक्विटी व्यवहारात २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मालमत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या खाजगी तक्रारीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि गांधी कुटुंबाच्या नियंत्रणाखालील यंग इंडियनवर फसवणूक, गुन्हेगारी कट, गुन्हेगारी विश्वासघात आणि मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. ईडीने या वर्षी १५ एप्रिल रोजी गांधी कुटुंबासह काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि इतरांविरुद्ध खटला दाखल केला होता.

Comments
Add Comment