Friday, May 2, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीविडिओ

Jewel Thief Movie : चोर पोलिसाचा फसलेला खेळ - ज्वेल थीफ

Jewel Thief Movie : चोर पोलिसाचा फसलेला खेळ - ज्वेल थीफ

चित्रपटगृहात सध्या फारसे हिंदी चित्रपट रिलीज होत नसले तरी ओटीटीवर मात्र वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट रिलीज होताहेत. त्यात नुकताच रिलीज झालाय तो ज्वेल थीफ हा चित्रपट. जयदीप अहलावत, सैफ अली खान, कुणाल कपूर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

नेटफ्लिक्सवर सध्या ज्वेलथीफ नावाचा चित्रपट रिलीज झालाय. रेड सन नावाच्या एका लाल हिऱ्याची चोरी या चित्रपटात होते. या कामगिरीसाठी सुप्रसिद्ध डॉन असलेला जयदीप अहलावत सैफ अली खान याला चोरीचं कॉन्ट्रॅक्ट देतो. सैफ चोरी करण्यात यशस्वी होतो का, या दोघांच्या मार्गावर असलेल्या कुणाल कपूर या पोलिसाच्या हाती हे दोघं लागतात का, हे चित्रपटात पाहावं लागेल. चित्रपटाची कथा रंगतदार वाटली तरी अत्यंत भुसभुशीत कथानक आहे.

बऱ्याचदा प्रेक्षक पुढे नेमकं काय होणार याचा अंदाज बांधू लागतो. त्यामुळे मजा येत नाही.. काही अशक्य वाटणारे प्रसंग यात आहेत. सगळ्यांची कामं चांगली झाली आहेत. बऱ्याच काळानंतर कुणाल कपूर याला पडद्यावर पाहताना मजा येते. चित्रपटाचं संगीत फारसं श्रवणीय नाही. त्यामुळे ते लक्षात राहत नाही. बाकी सगळं ठीकठीक आहे.. ज्यांना थरारपट आवडतात असे लोक एकदा हा चित्रपट पाहू शकतात... काय मग तुमचं काय मत यावर?

Comments
Add Comment