मुंबई: तुमच्या फोनमध्ये इंटरनेटचा स्पीड कमी झाला आहे. अशातच तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढेल.
फोन रिस्टार्ट करा
सगळ्यात आधी तुमचा फोन रिस्टार्ट करू शकता. यामुळे स्मार्टफोन आणि नेटवर्क दोन्ही रिफ्रेश होतात. हे ट्रिक सोपी आणि प्रभावी आहे.
याशिवाय तुम्ही फ्लाईट मोड सुरू करून बंद करू शकता. कमीत कमी १० सेकंदासाठी फोन फ्लाईट मोडवर ठेवा.
तुम्हाला तुमच्या अॅप्सचा कॅचे क्लिअर केला पाहिजे. अॅप्समध्ये स्टोर केलेल्या कॅचेमुळे अनेकदा इंटरनेट आणि फोन दोन्ही स्लो होतात.
जर तुमचा फोन खूप जुना असेल तर तुम्हाला अॅप्सचे लाईट व्हर्जन वापरावे लागेल. यामुळे कमी रॅम आणि स्टोरवाल्या फोन्सवर चांगला स्पीड मिळतो.
ऑटो अपग्रेड आणि बॅकग्राऊंड डेटासारख्या सेटिंग्स ऑफ करा. या सेटिंग्सला ऑफ करून तुम्ही इंटरनेट स्पीड सुधारू शकता.
फोनमध्ये इंटरनेट स्लो सुरू आहे तर तुम्हाला preffered Networkमध्ये बदल केला पाहिजे. तसेच तुम्ही जर सेटिंग्स autoवर ठेवा.
स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेटही इंटरनेट स्पीडसाठी गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचा फोन सतत अपडेट करत राहिला पाहिजे.