Saturday, May 24, 2025

कोकणताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Kokan : कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! कशेडी घाटातील दुहेरी वाहतूक १५ मेपासून सुरू

Kokan : कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! कशेडी घाटातील दुहेरी वाहतूक १५ मेपासून सुरू

रत्नागिरी : उन्हाळी सुटी लागली की चाकरमान्यांची पावले हळूहळू गावाच्या दिशेने पडतात. कोकणात जाण्यासाठी कोकणवासीयांची तयारी दोन - दोन महिन्यांपासून सुरु असते. रेल्वेची तिकिटे क्षणार्धात संपतात. तिकिट उपलब्ध नाही म्हणून काही चाकरमानी रस्ते मार्गाने प्रवासाचा पर्याय निवडतात. कोकणात जाताना रस्त्यात असलेल्या खड्ड्यांबाबत कोकणवासीयांची नेहमीच तक्रारी असतात. वाहतूक कोंडीची समस्याही भेडसावते. मात्र आता कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता आहे. कोकणातील कशेडी बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू होणार आहे.


मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांच्या पोलादपूर बाजूकडील कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वित झाला आहे. रत्नागिरी बाजूकडील वीजपुरवठा येत्या १०-१५ दिवसांतच पूर्ववत होईल. बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू असून, १५ मेपूर्वी दोन्ही बोगद्यांतील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.


मेमध्ये सुटीच्या हंगामात गावी येणाऱ्या मुंबईकरांची संख्या लक्षणीय असते. सणांच्या कालावधीत मुंबईकरांनी बोगद्यातूनच प्रवास करण्यास सर्वाधिक पसंती दिली होती. १५ मेपूर्वी पूर्ण क्षमतेने बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्रयत्नशील आहे. येत्या १०-१५ दिवसांत बोगद्यात २४ तास वीजपुरवठा कार्यान्वित होणार आहे. ऐन उन्हाळ्यात दोन्ही बोगद्यांत लागलेली गळती थांबविण्यासाठी पुन्हा ग्राऊंटिंगचा अवलंब करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


दोन्ही बोगद्यांतील मार्गावर दोन्ही बाजूंना २०० पथदीपांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी विद्युत खांबासह आवश्यक ती यंत्रसामग्रीही उपलब्ध झाली आहे. एक-दोन दिवसांतच पथदीपांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Comments
Add Comment