
मुंबई : प्रत्येक आठवड्याच्या रविवार दिवशी मुंबई लोकलबाबत (Mumbai Local) तांत्रिक बिघाड दुरुस्तीची किंवा इतर कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. येत्या रविवारी देखील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने यंत्रणा दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असल्याचे जाहीर केले होते. मात्र रविवार ४ मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक रद्द केला आहे.

मुंबई : बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor), चित्रपट निर्माता बोनी कपूर आणि अभिनेता संजय कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर (Nirmal Kapoor) यांचे आज, २ ...
वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट (एनईईटी-२०२५) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारी (ता. ४) रोजीचा उपनगरीय मार्गांवर नियोजित असलेला मेगा ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नीट परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रवासात अडथळा येणार नाही.
पश्चिम रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वेनेदेखील रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान अप व डाऊन फास्ट लाइनवर शनिवारी (ता. ३) मध्यरात्री १२.१५ ते ४.१५ दरम्यान चार तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या वेळी जलद गाड्या सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे.