भारताच्या इतिहासाशी गद्दारी, ज्यांनी प्राण गमावले त्या भारतीय सैनिकांचा अपमान?

  57

‘तर ईशान्य भारत ताब्यात घ्या!’ - बांगलादेशच्या सल्लागाराची भारताविरोधात गरळ


ढाका : १९७१ मध्ये भारताने रक्त सांडलं... हजारो सैनिकांनी प्राण गमावले... आणि बांगलादेशाला दिलं स्वातंत्र्य! पण आज, त्याच भारताला पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा बांगलादेशातून ऐकू येतेय!


बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांचे जवळचे आणि माजी लष्करी अधिकारी ए.एल.एम. फजलूर रहमान यांनी धक्कादायक विधान केलं आहे. “भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला, तर बांगलादेशने ईशान्य भारतातील राज्यांवर ताबा मिळवावा,” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहून थेट चीनबरोबर लष्करी कारवाईचीही चर्चा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.



ही पोस्ट केवळ वादग्रस्त नाही, तर भारताच्या इतिहासाशी गद्दारी करणारी आहे. कारण ज्याचं स्वातंत्र्य भारताने मिळवून दिलं, तो देश आता भारतविरोधी भाषा बोलतोय?



सरकारने दिलं तात्काळ स्पष्टीकरण


या विधानावर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने स्पष्टीकरण दिलं असून, “ही वैयक्तिक मतं आहेत, सरकार याचं समर्थन करत नाही,” असं प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटलं. मात्र देशाच्या सल्लागार मंडळातील व्यक्ती अशा प्रकारची भाषा बोलत असल्याने, बांगलादेशच्या भूमिकेवर संशय घेणं स्वाभाविक ठरतं.



चीनच्या दौऱ्यावरून काय स्पष्ट होतंय?


युनूस अलीकडेच चीनच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी ईशान्य भारतातील सीमावर्ती राज्यांचा उल्लेख करत, “या भागातून चीनच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते,” असं वक्तव्य केलं. त्यानंतर लगेच फजलूर रहमान यांचं ही पोस्ट येणं, हे नुसतं योगायोग मानायचं का?


दरम्यान, भारत शांत आहे, पण दुर्बल नाही. भारतानं नेहमीच आपले शेजारी मित्र मानले... पण अशा धोरणांमुळे जर कोणी भारताची सहनशीलता परीक्षा घेत असेल, तर त्यांना इतिहासाची उजळणी करावी लागेल.

Comments
Add Comment

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,

२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १

ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लावला टॅरिफ, आदेशावर केली स्वाक्षरी, भारतासह ७० देशांवर होणार परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेताना यांनी अनेक देशांच्या वस्तूंवर १० ते ४१

Ashish Shelar : नेटफ्लिक्सने मराठी कंटेंट क्रिएटर्स व मनोरंजन उद्योगासोबत भागीदारी करावी : मंत्री आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन लॉस एंजेलिस : मनोरंजर

रशियामध्ये भीषण भूकंपानंतर अनेक देशांमध्ये अलर्ट!

मॉस्को : रशियाच्या पूर्वेकडील कामचाटका द्वीपकल्पाच्या समुद्रकिनारी बुधवारी ८.८ रिश्टर स्केलचा भयंकर भूकंप

ट्रम्प भारतावर भडकले, घेतला टोकाचा निर्णय

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयातशुल्क (कर) अर्थात टॅरिफ लादण्याची