Sunday, August 24, 2025

अभिनेता एजाज खान आणि उल्लू ॲपवर बंदी घाला

अभिनेता एजाज खान आणि उल्लू ॲपवर बंदी घाला

अश्लीलतेचा कळस गाठणा-या 'हाऊस अरेस्ट' रिॲलिटी शोवर भडकल्या चित्रा वाघ

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'हाऊस अरेस्ट' रिॲलिटी शो हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यावर होणारे अश्लील क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर हा शो वादग्रस्त ठरला आहे. या शोवर अश्लीलतेच्या मर्यादा पार झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करून अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म 'उल्लू'वर २० एप्रिल पासून नवा रिॲलिटी शो 'हाऊस अरेस्ट' सुरु झाला. 'बिग बॉस ७' स्पर्धक एजाज खानचा हा शो आहे. या शोचे अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर हा शो वादग्रस्त ठरला आहे. या शोवर अश्लीलतेच्या मर्यादा पार झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करून अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी या शोबद्दल ट्विट केले असून माहिती व प्रसारण मंत्री यांनी अशा प्रकारच्या शोच्या कंटेंटवर मर्यादा घालण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

“स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे.असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे. मी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. “हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे!”

Comments
Add Comment