Saturday, May 3, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार एप्रिलचा हप्ता!

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार एप्रिलचा हप्ता!

मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई : महायुती (Mahayuti) सरकारच्या लाडक्या बहिणी (Ladki Bahhin Yojana) आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे डोळे लावून बसल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी अक्षय्य तृतीयेच्या औचित्यावर बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, असे जाहीर केले होते. मात्र एप्रिल महिला सरला असून अद्याप महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. यासंदर्भात अदिती तटकरेंनी आता नवी माहिती दिली आहे.

'येत्या २ ते ३ दिवसांत खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.' मंत्री अदिती तटकरेंनी एक्स हँडलवर ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विट मध्ये त्यांनी लिहिले की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी, पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल'.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिनाअखेरीस २५ तारखेपर्यंत पैसे मिळतात. एप्रिल महिन्यात मात्र पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांना या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र एप्रिल महिना हा आर्थिक वर्षासुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याची माहिती आहे.

यातच अदिती तटकरेंनी लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी २ कोटी ४७ लाख आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे.

Comments
Add Comment