

खूश खबर... LPG सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
मुंबई: दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे मे महिन्याच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅसचे दर अपडेट केले आहेत. (LPG Cylinder Price) यावेळी मे महिन्यात ...
दारूच्या नादात जीव गमावणारा तरुण कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचे नाव कार्तिक असे होते. वेंकट रेड्डी, सुब्रह्मण्यम आणि इतर तीन जणांसोबत दारू पिण्यासाठी पैज लावली होती. पैज जिंकल्यास कार्तिकला दहा हजार रुपये मिळणार होते.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्यात यश!
राज्यात २६ बालविवाह टळले बालविवाह रोखण्यासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार मुंबई : अक्षय्य तृतीया या पवित्र आणि शुभ मानल्या जाणाऱ्या ...
पैशांसाठी कार्तिकने दारुच्या पाच बाटल्या खरेदी केल्या आणि एकामागून एक रित्या करत गेला. एवढी दारू एकदम पोटात गेल्यामुळे कार्तिकची तब्येत बिघडली आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. मित्रंनी कार्तिकला तब्येत बिघडताच मुलबागल येथील रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना कार्तिकचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत वेंकट रेड्डी आणि सुब्रह्मण्यम यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे २६ लाख नागरिकांचा दारू प्यायल्यामुळे मृत्यू होतो. जगभरात वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ४.७ टक्के मृत्यू हे दारू पिण्यामुळेच होतात.