
भारताच्या मनोरंजन क्षेत्राचा जागतिक प्रवास
भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राने गेल्या काही वर्षांत मोठी झेप घेतली आहे. पारंपरिक चित्रपटसृष्टीपासून ते ओटीटी, गेमिंग आणि अॅनिमेशनपर्यंत, विविध माध्यमांतून भारतातील सर्जनशीलता जागतिक स्तरावर पोहोचू लागली आहे. याच प्रवासाला एक भक्कम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारत सरकारने उचललेलं पाऊल म्हणजे WAVES 2025 (World Audio Visual & Entertainment Summit).
ही परिषद 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडते आहे आणि यामध्ये भारतातील आणि जगभरातील सर्जनशील व्यक्ती, स्टुडिओ, तंत्रज्ञ, आणि धोरणकर्ते एकत्र येणार आहेत.
WAVES 2025 चे वैशिष्ट्य
-
‘Create in India’ या अभियानाचा गाभा – भारतातच दर्जेदार कंटेंटची निर्मिती करून तो जागतिक बाजारात पोहोचवण्याचा प्रयत्न.
-
अॅनिमेशन, वेबटून्स, मंगा, गेमिंग, संगीत, साहित्य, स्क्रिप्ट राइटिंग यांसारख्या क्षेत्रांत भारतातील तरुणांना संधी.
-
Create in India Challenge – Season 1 अंतर्गत २५ प्रकारांच्या स्पर्धा – जे स्पर्धकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देतील.
-
सामग्रीचे संरक्षण – फिंगरप्रिंटिंग, वॉटरमार्किंग आणि AI आधारित ट्रॅकिंगसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कंटेंट चोरण्यावर नियंत्रण.
WAVES Declaration 2025
या परिषदेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘WAVES Declaration 2025’. हे घोषणापत्र मीडिया क्षेत्रातील आचारसंहिता, नियमावली आणि जागतिक सहकार्याविषयी मार्गदर्शक ठरेल. यात भारताचा जागतिक धोरणनिर्मितीत थेट सहभाग असेल.
परिणामकारक अपेक्षा
-
भारताचे मीडिया व मनोरंजन क्षेत्र सध्या अंदाजे २.३ लाख कोटींचे आहे आणि ते ४.३ लाख कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.
-
रोजगार संधी, नवउद्योगांची निर्मिती, परकीय गुंतवणुकीला चालना.
-
विशेषतः VFX, गेम डिझाईन, स्क्रिप्ट रायटिंग, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत तरुणांसाठी मोठ्या संधी.
WAVES 2025 ही केवळ एक परिषद नाही, तर भारताच्या सांस्कृतिक आणि कलात्मक सामर्थ्याचे जागतिक प्रदर्शन आहे. ‘क्रिएट इन इंडिया’ ही घोषणा आता कृतीत उतरते आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारत हा केवळ कंटेंटचा उपभोग करणारा नव्हे, तर त्याची जागतिक निर्मिती करणारा देश बनू लागला आहे. ही परिषद भारताच्या सर्जनशील भविष्याची दिशा ठरवणारी आहे.