
नवी दिल्ली: आधीच एप्रिलमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या देशभरातली लोकांना मे महिन्यातही काही दिलासा मिळणार नाही आहे. मे महिन्यात देशभरात उकाड्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार यावेळेस उष्णतेची लाट सामान्यपणे १ ते ३ दिवसांऐवजी २ ते ७ दिवसांपर्यंत राहू शकते. याशिवाय, या दरम्यान दिवस आणि रात्री दोन्हीचे तापमान सामान्यपेक्षा अधिक असणार आहे.
देशातील अधिकांश भागात यावेळेस कमाल आणि किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा अधिक असेल. दरम्यान, दक्षिण आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी राहील असा अंदाज आहे. विशेषकरून उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात उकाड्याचे प्रमाण प्रचंड असेल.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मे महिन्यात देशभरात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळेस सामान्यपेक्षा १० टक्के अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे. उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो. येथे साधारणपणे या महिन्यात देशभरातली ६४ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होतो.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटची मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तसेच यावेळेस संपूर्ण देशात मान्सून सामान्यपेक्षा १०५ टक्के राहील. एल निनो आणि इंडियन ओनल डायपोलची स्थिती न्यूट्रल राहील.